महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक ! कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण - ठाणे कोरोना न्यूज

एखाद्या कैद्याला थंडी - ताप आल्यास कारागृहात विलगीकरण कक्षही बनवण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे.

आधारवाडी कारागृह
Aadharwadi Jail

By

Published : Apr 20, 2021, 4:16 PM IST

Updated : Apr 20, 2021, 7:43 PM IST

ठाणे- कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आधारवाडी कारागृहात सध्या १९२२ कैदी असून यापैकी ३० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित कैद्यांची तब्येत ठीक असून त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
कैद्यांचे कोविड लसीकरण सुरूसध्या वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी आधारवाडी कारागृहातील ३५० कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३० कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व कैद्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कैद्यांचे कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोविड रुग्ण सापडल्यानंतर कारागृहात सॅनिटायजेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे.डॉन बोस्को शाळेमध्येही कैद्यांसाठी विलगीकरण कक्षएखाद्या कैद्याला थंडी - ताप आल्यास कारागृहात विलगीकरण कक्षही बनवण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे. कारगृहात आजपासून लसीकरण प्रक्रियादेखील सुरु केली असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.
Last Updated : Apr 20, 2021, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details