ठाणे - रुग्णांना कालबाह्य औषधे आणि चुकीची इंजेक्शन दिल्याने १० रुग्ण अत्यवस्थ झाल्याची खळबळजनक घटना येथील शासकीय रूग्णालयात घडली आहे. ही घटना अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात उघडकीस आली. यानंतर अत्यवस्थ झालेल्या सर्वच १० रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. तर 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयातील भीषण वास्तव समोर आले आहे.
अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार आलेल्या आठ ते दहा महिला रुग्णांना मोनोसेफ नावाचे अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यातील काही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहे. इंजेक्शन देतात रुग्णांना मळमळणे, उलटी होणे तसेच पोटात दुखणे हे प्रकार सुरू झाले. तर हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असताना देखील त्याचा वापर करण्यासाठी तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर सुरू करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केला आहे. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाला.