महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापुरात आढळले 3 कोरोनाबाधित रुग्ण, शहरात खळबळ - ठाणे कोरोना न्यूज

बदलापुरात कोरोना विषाणुचा शिरकाव झाला आहे. शहरात तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे.

corona virus in badlapur thane
बदलापुरात आढळले 3 कोरोनाबाधित रूग्ण

By

Published : Apr 11, 2020, 12:29 PM IST

Updated : Apr 11, 2020, 1:22 PM IST

ठाणे- बदलापुरात कोरोना विषाणुचा शिरकाव झाला आहे. शहरात तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या शंभरवर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक 49 रुग्ण कल्याण डोंबिवली शहरात आहेत. या खालोखाल ठाणे महापालिका क्षेत्रात आहेत. बदलापूर शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये 21 वर्षीय तरुणी व 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर एक 23 वर्षीय तरुणाचा देखील समावेश आहे. या तिघांपैकी 2 रुग्ण बदलापूर पूर्व परिसरात राहणारे आहेत. तर 1 रुग्ण बदलापूर पश्चिम परिसरात राहणारा आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून आलेल्या परिसरात सर्वेक्षण सुरू केले आहे. तर नगरपरिषद प्रशासनाने हा परिसर सील केला आहे.

बदलापूरमध्ये आढळलेल्या तीन रुग्णांचा इतिहास -

पोलिसाची पत्नी (४५), मुलगी (२०) यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण लॉकडाऊन असताना साताऱ्याला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते, तिथे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे.

तर वोकहार्ट हॉस्पिटलच्या बदलापुरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला (वय २८) कोरोनाची लागण झाली. तिघांनाही बदलापूर पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमधून उल्हासनगरच्या कोव्हीड स्पेशल रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

Last Updated : Apr 11, 2020, 1:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details