नवी मुंबई -१० मार्चपासून नवी मुंबई शहरात कोरोनाच्या रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 'मिशन ब्रेक द चेन' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये टेस्टिंगप्रमाणे लसीकरण वाढीवर भर देण्यात येत आहे. बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून अवघ्या तीन दिवसात ३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
१५५ जणांची टीम विशेष पथकात कार्यान्वित -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी १५५ जणांची टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचारी आहेत. अशा एकूण ३१ पथकांच्या माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे.
मोठ्या प्रमाणात दंड वसुली -