ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, आज डोंबिवलीत एका वयोवृद्ध कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यत महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३०५ झाली असून त्यापैकी २१६ रुग्णांवर उपचार सुरू आहे आहे. तर, ८५ जणांना सुट्टी मिळाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवलीत २४ तासात आढळले कोरोनाचे २४ रुग्ण; बाधितांची संख्या पोहोचली ३०५ वर - 24 corona affected in 24 hours thane
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रहिवासी असलेले, मात्र मुंबई व ठाणे येथील अत्यावश्यक सेवेतील कोरोना बाधितांची संख्या ही १२१ इतकी असून त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची संख्या ही ४१ इतकी आहे. यामुळे मुंबईतून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची एकूण संख्या १६२ च्या घरात पोहचली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रहिवासी असलेले, मात्र मुंबई व ठाणे येथील अत्यावश्यक सेवेतील कोरोना बाधितांची संख्या ही १२१ इतकी असून त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची संख्या ही ४१ इतकी आहे. यामुळे मुंबईतून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या निकट सहवासातील बाधितांची एकूण संख्या १६२ च्या घरात पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज ८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ही ८५ इतकी आहे. तर, आतापर्यत ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन वाढवल्याने स्थलांतरीत मजूरांचा धीर खचला; वाहनांना लटकून होतोय जीवघेणा प्रवास