ठाणे - एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचार केला. तर या तरुणीच्या प्रियकराने या पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा लैंगिक विकृतीचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आला आहे. या प्रकरणी विकृत तरुण व तरुणी विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार -
कल्याण पूर्व परिसरात पीडित अल्पवयीन भाऊ बहीण कुटूंबासह राहतात. तर आरोपीही त्याच परिसरात राहत असून 3 महिन्यापूर्वी पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर २३ वर्षीय आरोपी तरुणीने अत्याचार केला. त्यांनतर धमकी देऊन सातत्याने पीडित मुलावर ती लैंगिक अत्याचार करीत होती. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी तरुणी पीडित मुलाची नातेवाईक आहे. आरोपी तरुणी इथेच थांबली नाही तिने तिच्या प्रियकरालाही पीडित मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत लैगिक अत्याचार करण्यास भाग पाडले.