महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Covid 19: दिलासादायक , मीरा भाईंदरमध्ये बुधवारी 221 जण कोरोनामुक्त - Mira Bhayandar latest news

मीरा भाईंदर हद्दीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना, बुधवारी शहरासाठी दिलासादायक बातमी मिळाली. कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजार पार झाली असली तरी कोरोना मुक्तांची संख्या सहा हजार वर पोहोचली आहे. आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २४ हजार १५३ जणांनी कोविड चाचणी करण्यात आली आहे. या मध्ये १५ हजार ५५० जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. तर ७ हजार ९८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Covid news
Covid news

By

Published : Jul 30, 2020, 10:56 AM IST

मीरा भाईंदर(ठाणे)-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सहा हजार वर पोहोचली आहे. बुधवारी २२१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना मुक्तांची संख्या ६ हजार ९३ झाली आहे.

मीरा भाईंदर हद्दीत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना, बुधवारी शहरासाठी दिलासादायक बातमी मिळाली. कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजार पार झाली असली तरी कोरोनामुक्तांची संख्या सहा हजार वर पोहोचली आहे. आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २४ हजार १५३ जणांनी कोविड चाचणी करण्यात आली आहे या मध्ये १५ हजार ५५० जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. तर ७ हजार ९८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बुधवारी शहरात १४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ५ जणांचा उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. या आकडेवारीनुसार मृत्यूची एकूण संख्या २६६ वर पोहोचली.

तसेच शहरातील आणखी ६२० जणांचा कोविड १९ चाचणीचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. १ हजार ६२४ रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ९६ नवीन रुग्ण तर ४९ जणांचा कोरोना बधितांचा संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे, अशी माहिती मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

मीरा भाईंदर शहरात टक्केवारी नुसार कोरोनावर उपचार घेत असलेल्याची टक्केवारी २०.३४% आहे,मृत्युदर ३.३३% तर कोरोनामुक्तांची टक्केवारी ७६.३२% आहे.कोरोना मुक्तांची संख्येत वाढ होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details