नवी मुंबई -पनवेल जवळील माची प्रबळ येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आज पनवेल तालुका पोलिसांना व शोध पथकाला कलावंतीन बुरुजाजवळ आढळला. यामुळे पोदी परिसरात शोककळा पसरली आहे.
पनवेल जवळील पोदी-1 येथे राहणारा अनुराग गुडीले (वय 22) हा तरुण शनिवारी मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर त्याचा संपर्क होत नसल्याने सोमवारी खांदेश्वर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन घेतले असता ते माची प्रबळ परिसरात आढळून आले. तालुका पोलीस ठाण्याची हद्द ही पनवेल तालुका पोलिसांची असल्याने विशेष पथक व तरुण वर्ग त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेले असता तेथे त्याचा मंगळवारी मृतदेह आढळून आला.
हरहुन्नरी तरुण गेल्याने हळहळ