ठाणे- भिवंडीत २१ वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकर्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात घडली असून याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नारायण शेलार (वय २१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा भिवंडी तालुक्यातील करंजोटी गावात आपल्या कुटुंबासह रहात होता. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंदनजीक असलेल्या जिंदाल कंपनीत कामाला होता. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने त्याच्या मोबाइलवर संपर्क करून त्याला गावानजिक असलेल्या एका शेतात बोलावले. त्याठिकाणी त्याची हत्या करण्यात आली.