महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी आढळले २० कोरोनाचे नवे रुग्ण

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील ११, नवीन पनवेलमधील ६ तर ओवेपेठमध्ये १, तक्का येथे १, नावडे मधील १, रुग्णांचा समावेश आहे.

By

Published : May 25, 2020, 10:40 AM IST

corona
पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी आढळले २० कोरोनाचे नवे रुग्ण

नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी २० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर महापालिका हद्दीतील १२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी परतले आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील ११, नवीन पनवेलमधील ६ तर ओवेपेठमध्ये १, तक्का येथे १, नावडे मधील १, रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण ३७१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १४७ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.कामोठ्यात ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कामोठे, सेक्टर-३५, मधील एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील एक महिला शताब्दी हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कातून या पाच जणांना संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कामोठे, सेक्टर-८, येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंब प्रमुख कुर्ला येथे कार्यरत असून याअगोदर कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातून या दोघांना संसर्ग झाला आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-९, मध्ये एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंब प्रमुख लालबाग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून याअगोदर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातून या तिघांना संसर्ग झाला आहे.

कामोठे, सेक्टर-२१, मधील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती वडाळा डेपोमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कामोठे, सेक्टर-१०, येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.नवीन पनवेलमध्ये कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळले आहेत. नवीन पनवेल, सेक्टर-५ मध्ये एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोरोना पॉझिटिव्ह आले होते, त्यांच्या संपर्कातून या तिघांना संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय नवीन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप, चाळ नं. ६२ येथील ३२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या भागामध्ये याआधीच बरेच रुग्ण सापडले असून या व्यक्तीला त्याठिकाणीच संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नवीन पनवेल, सेक्टर-१६, मधील ५४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती धारावी बेस्ट बस डेपोमध्ये निरिक्षक म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय नवीन पनवेल, सेक्टर-१३, ए टाईप येथील २८ वर्षीय वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या भागामध्ये याआधीच बरेच रुग्ण सापडले असून या व्यक्तीला त्याठिकाणीच संसर्ग झाला आहे.

तसेच तळोजे, ओवे पेठ येथील ५५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला मधुमेहाच्या उपचारासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जात होती. त्या हॉस्पिटलमध्येच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच पनवेल, तक्का, येथील ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला आहे. याशिवाय नावडे येथील, देवदृष्टी सोसायटीतील ३० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती जेएनपीटी, उरण येथे डाक्यूमेंट क्लीअरींग विभागात कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.पनवेल महापालिका हद्दीतील १२ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. यामध्ये कामोठ्यातील ६, खारघरमधील ४ आणि कळंबोलीतील २ रुग्णांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details