ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज नव्याने २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये कल्याणमध्ये राहणाऱ्या एका ३२ वर्षीय ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय व डोंबिवलीतील २ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे. तर तीन पोलीस कर्मचारीदेखील आहेत.
कल्याण-डोंबिवलीत नव्याने २० कोरोनाबाधित रुग्ण; ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयचा समावेश - कल्याण डोंबिवलीत नव्याने २० कोरोनाबाधित रुग्ण ; ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयचा समावेश
आतापर्यंत एकाच दिवसात २० रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर कल्याण-डोंबिवली हद्दीतील रुग्णांची संख्या आता २५३वर पोहचली आहे.
खळबळजनक बाब म्हणजे, आतापर्यंत एकाच दिवसात २० रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर कल्याण-डोंबिवली हद्दीतील रुग्णांची संख्या आता २५३वर पोहचली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने दोन दिवसापूर्वीच पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी महापालिका हद्दीत वास्तव्यास असलेल्या मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कमर्चाऱ्यांची राहण्याची सोय मुंबईतच करावी, असा निर्णय घेतला होता. मात्र त्यांनतर या निर्णयावर टीकेची झोड उठल्याने त्यांनी कालच हा निर्णय मागे घेतला आहे. तर आज आढळून आलेल्या २० रुग्णांपैकी ९ रुग्ण मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कमर्चारी आहेत. तर दोन खाजगी कंपनीतील कर्मचारी आहेत. तसेच ९ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संर्पकात असल्याचे समोर आले आहे.
२५३ रुग्णांपैकी आतापर्यत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्याच्या स्थितीत १७४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.