महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी ग्रामीणमध्ये कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या निकट सहवासात असणाऱ्या कुटुंबातील आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या तालुक्यातील रुग्णांची संख्या रुग्णांची 10 वर पोहचली आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण
भिवंडी ग्रामीणमध्ये कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील 2 महिलांना कोरोनाची लागण

By

Published : Apr 22, 2020, 7:57 AM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या निकट सहवासात असणाऱ्या कुटुंबातील आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, भिवंडी तालुक्यात शहरी भागातील रुग्णांची संख्या 5 तर ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या 5 वर पोहचल्याने रुग्णांची 10 वर पोहचली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे महानगरपालिकेत स्वच्छता मुकादम म्हणून कार्यरत 57 वर्षीय व्यक्तीचा 17 एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. सदर व्यक्ती भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे राहणारा असून त्यांच्या कुटुंबातील 5 व्यक्तींना ठाणे भाईंदर मार्गावरील रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 26 वर्षीय सून व 24 वर्षीय मुलगी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details