महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार - ठाणे जिल्ह्यातील क्राईम विषयी बातम्या

पहिल्या घटना मौलाना आझादनगरच्या शांतीनगर परिसरातील आहे. या घटनेत १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अजीम सलीम शेख ( वय २०, रा. गैबीनगर ) याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या अजीमकडे पीडितेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला.

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

By

Published : Nov 19, 2019, 8:46 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्काराने भिंवडी हादरली आहे. दोघींपैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या दोन्हीं घटनांचे गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटना मौलाना आझादनगरच्या शांतीनगर परिसरातील आहे. या घटनेत १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अजीम सलीम शेख ( वय २०, रा. गैबीनगर ) याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या अजीमकडे पीडितेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला.

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

तेव्हा पीडितेला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आणि तिने अजीम विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अजीम घरातून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सोनाळे येथील चाळीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजण्याच्या सुमाराच ३ अनोळखी नराधमांनी पीडितेचे अपहरण केले आणि तिचा बलात्कार केला. तीन दिवसानंतर पीडितेने कशीबशी सुटका करत घर गाठले. त्यानंतर तिने घडलेली हकिकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. तेव्हा कुटुंबियांनी सोमवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला असताना पोलिसांनी केवळ अपहरण व धमकावणे अशी कलम लावत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे मुलीवर बलात्कार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असताना पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, बलात्कार, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना बेसुमार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details