ठाणे- महापालिका हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाअंतर्गत २ लक्ष वृक्षलागवड तसेच 1 लक्ष खारफुटीची लागवड करण्यात येणार आहे. पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडून दुर्घटना होऊ नये यासाठी वृक्षांचा समतोल राखुन छाटणी करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त तथा वृक्षप्राधिकरण अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी उद्यान विभागाला दिले आहेत. पावसाळ्यात करण्यात येणारी वृक्षलागवड तसेच इतर कामांबाबत आढावा घेण्याबाबतची बैठक वृक्षप्राधिकरण समिती अध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात ठाण्यातील परिसरात होणार २ लाख वृक्षलागवड - tree
ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याकरिता वृक्षप्राधिकरणामार्फत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सीड बॉलचे मोफत वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नवीन सी.आर.झेड. लाईन्सनुसार नव्याने उपलब्ध होणाऱ्या मोकळया जागेवर कांदळवन लागवड करण्याऐवजी वृक्षांची लागवड करण्यात यावी जेणेकरुन त्याठिकाणी भेट देत असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांकरिता हरितक्षेत्र तयार होईल असेही या बैठकीत नमूद करण्यात आले.
ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याकरिता वृक्षप्राधिकरणामार्फत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सीड बॉलचे मोफत वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नवीन सी.आर.झेड. लाईन्सनुसार नव्याने उपलब्ध होणाऱ्या मोकळया जागेवर कांदळवन लागवड करण्याऐवजी वृक्षांची लागवड करण्यात यावी जेणेकरुन त्याठिकाणी भेट देत असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांकरिता हरितक्षेत्र तयार होईल असेही या बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टातंर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीकरिता वृक्षप्राधिकरण सदस्यांना प्रत्येकी एक ठिकाण देवून प्रत्येकामार्फत वृक्षलागवडीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
ठाणे महानगरपालिकामार्फत वृक्षांचे पुनर्रोपण करणारे मशीन नागरिक, विकासक, इतर संस्था यांना भाडय़ाने देण्यात यावे जेणेकरुन शहरातील बाधित वृक्षांचे पुनर्रोपण तांत्रिक दृष्ट्या शक्य होईल अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाल्यांचे विकसीकरण व सफाईचे काम सुरू असून नाल्यांच्या भिंतीवर उगवलेली प्रामुख्याने पिंपळ व इतर प्रजातींची झाडे काढून टाकण्यात यावी असे आदेश या बैठकीत देण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित तसेच खासगी अर्जदारांमार्फत विकासकामांमध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांच्या तोडणे/ पुनरोपण करणे प्रित्यर्थ 8 ते 10 फूट उंचीचे १७ हजार ६३५ वृक्षांचे नव्याने रोपण करण्यात येणार असल्याचे या बैठकी दरम्यान नमूद करण्यात आले.