ठाणे- उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी ३ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन तरूणींसह एका व्यक्तीचा समावेश आहे. या तिन्ही वेगवेगळ्या घटनांमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नं ४ येथील ब्राम्हणपाडा परिसरात राहणारे अजय बर्वे (वय ३८) यांनी आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत २ तरुणींने आत्महत्या केल्याच्या घटना मानेरेगाव परिसरात घडल्या. सपना शर्मा (१९) हिने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर नेहा भोईर (वय २०) या तरूणीनेदेखील बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.