महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्याचा अंदाज न आल्याने उल्हास नदीत दोन तरुण बुडाले

कल्पेश चौधरी (वय २०) आणि कार्तिक लाडी (वय १७) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बचावकार्य सुरू आहे.

By

Published : Mar 22, 2019, 4:57 AM IST

उल्हास नदीत दोन तरुण बुडाले

ठाणे - उल्हास नदीत दोन तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कल्पेश चौधरी (वय २०) आणि कार्तिक लाडी (वय १७) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.


हे दोघेही बदलापूर पूर्व भागातील रहिवासी असल्याचे समजले आहे. घटनास्थळी पोलिस आणि फायर ब्रिगेड दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details