ठाणे -भिवंडीत देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसांसह गुन्हेरागांच्या दुकलीला अटक करण्यात आले आहे. निजामपूरा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मोहंमद हनीफ नईमुद्दीन शेख (वय २९, रा. नदीनाका, भिवंडी) आणि सैफ एजाज मोमीन (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, भिवंडी ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
भिवंडी परिमंडळच्या हद्दीत अवैध धंदे आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या आदेशवरून निजामपुरा पोलीस ठाण्याचे वपोनि, विजय डोळस यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुरा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अमलदार गस्तीवर होते. यानुसार स. फौ. खान यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत भिवंडीत पिस्तूलसह काडतूसे घेऊन दोन गुन्हेगार भिवंडीतील मिल्लतनगर, परिसरात येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या पथकाने सापळा रचला होता. त्यावेळी मोहंमद शेख आणि सैफ मोमीन यांच्या संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक स्टिल बॉडीचे असलेले देशी बनावटीचे मॅगझीन असलेले पिस्तूल, ३ पितळी घातुची जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व ६६ रू. रोख, असा एकूण ३५ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.