ठाणे - कोरोनाच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारीचा आलेख उंचवला असल्याचे दिसून आले आहे. अशाच काळात भिवंडी पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली आहे. 14 लाखांच्या चोरी प्रकरणी दोन चोरट्यांच्या मुसक्या नारपोली पोलिसांनी आवळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच गोदामातील 14 लाख 27 हजार 200 रुपये किमतीचे ब्रास व कॉपर शीट चोरी झाल्याची घटना भिवंडीतील श्रीराम कॉम्प्लेक्स, राहनाळ येथे घडली होती. या चोरीप्रकरणी व्यावसायिक संदीप प्रकाश शाह यांनी 22 ऑगस्ट रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिली होती. या तक्रारानंतर नारपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक माहिती व आपल्या गुप्त बतमीदारांमार्फत या चोरीच्या घटनेचा तपास लावला.