महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

coronavirus : भिवंडीत 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह, एकूण बाधितांचा आकडा 321 वर - कोरोना ठाणे

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 321 वर पोहोचला असून त्यापैकी 138 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Corona report thane
प्रतिकात्मक

By

Published : Jun 3, 2020, 8:22 PM IST

ठाणे- निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी राज्यात हाहाकार माजवला. त्यातच आज देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात 12 तर ग्रामीण भागात 7 असे 19 नवे रुग्ण आढळले आहेत. या 19 नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 321 वर पोहोचला आहे.

भिवंडी शहरात आज 12 नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत शहरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 197 वर पोहोचला असून 80 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर, 106 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

तर, ग्रामीण भागात बुधवारी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 2, दिवा अंजूर येथे 4 तर अनगाव येथे एक असे 7 नवे रुग्ण आढळले आहेत. या 7 नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 124 वर पोहोचला असून त्यापैकी 58 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 63 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता 321 वर पोहोचला असून त्यापैकी 138 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 169 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details