महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नेपाळला जाण्याच्या तयारीतील आरोपी गजाआड - अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सात वर्षीय मुलीला लग्नाला जेवायला घेऊन जातो असे आरोपीने पीडितेच्या पालकांना सांगितले. त्यानंतर त्या चिमुकलीला एका बांधकाम सुरू असलेल्या गोडाऊनमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलीला कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीला दगडावर ढकलून दिले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Jun 28, 2021, 7:51 AM IST

नवी मुंबई - रबाळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राज रामसिंग नागरजी(१८) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्नातील पार्टीला घेऊन जातो सांगून बलात्कार-

रबाळे एमआयडीसी परिसरातील यादव नगर येथील एका सात वर्षीय मुलीला लग्नाला जेवायला घेऊन जातो असे आरोपीने पीडितेच्या पालकांना सांगितले. त्यानंतर त्या मुलीला एका बांधकाम सुरू असलेल्या गोडाऊनमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलीला कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीला दगडावर ढकलून दिले. त्यामुळे पीडित मुलीला दुखापत झाली.


प्रकार कळताच आईने घेतली पोलीस ठाण्यात धाव-

संबंधित अल्पवयीन मुलगी घरी पोहोचताच तिची जखमी अवस्था पाहताच आईने चौकशी असता, मुलीने राज नागरजी याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. सर्व प्रकार ऐकल्यावर आईने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आरोपी नेपाळला पळून जायच्या आत पोलिसांनी आवळल्या मुसक्या-

गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहिती नुसार राज रामसिंग नागरजी (१८) याच्या मुसक्या आवळल्या राज हा गुन्हा करून त्याच्या नेपाळ येथील मूळगावी जाण्याच्या तयारीत होता. अवघ्या तीन तासात काहीही आरोपी बद्दल माहिती नसताना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून, त्याला २६ जूनला कोर्टात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details