ठाणे -कोरोना महामारीच्या काळात (Corona Lockdown ) ठाणे शहरातील पथविक्रेत्यांच्या (Hawkers In Thane ) व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' ( PM SAVNIDHI ) योजनेची अमलबजावणी ठाणे शहारत करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या ( Thane Corporation ) समाज विकास विभागाच्या वतीने या योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले असून यासाठी शहरातील तब्बल १८ हजार ७६२ फेरीवाल्याचे अर्ज आले आहेत. आतापर्यंत १३ हजार ९७८ फेरीवाल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ८ हजार ५१० पथविक्रेत्यांना कर्ज ( Thane Corporation Provide Loan To Hawkers ) वितरित करण्यात आले आहेत. या अंतर्गत पथविक्रेत्यांना १० हजाराप्रमाणे कर्ज देण्यात येणार आहे.
ठाणे शहरात उद्धिष्ठपूर्ती - कोरोना महामारीच्या काळात (Corona Lockdown ) विपरित परिणाम झाल्यामुळे शहरी भागात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या, व्यावसायिकांना १ वर्षाच्या कालावधीसाठी १० हजारपर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी प्रधानमंत्री पदपथ व्यावसायिक आत्मनिर्भर निधी योजनेची ( PM SAVNIDHI ) अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ठाणे शहरात अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार ठाणे शहरात उद्धिष्ठपूर्ती झाली असून ठाण्यातील हजारो फेरीवाले आत्मनिर्भर होणार आहेत.