ठाणे - पळवून आणलेल्या मुलीच्या वादातून १६ वर्षीय मुलाची त्याच्याच २० वर्षीय मित्राने बहाण्याने शेतात नेऊन धारदार कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( 20 year youngster killed his friend thane ) ही घटना शहाड परिसरातील बंदरपाडा येथील शेतात घडली आहे. ( Thane Youth Murder ) याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. ( Khadakpada Police Station ) पोलिसांनी तपास सुरू केला असता पाच तासातच हत्येचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. शाहरूख यासीन शेख उर्फ इमरान (वय २०, रा. बनेली-टिटवाळा) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बहाण्याने दुचाकीवर बसून नेले शेतात -
काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरातून आरोपी शाहरूखने एक मुलगी पळवून आणली होती. त्याच मुलीच्या वादातून ८ दिवसांपूर्वी आरोपीला मृत अरमान व त्याच्या मित्राने बेदम मारहाण केली होती. याच भांडणाचा राग मनात धरून २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपीने मृताला बहाण्याने दुचाकीवर बसवून शहाड भागातील बंदरपाडा परिसरात असलेल्या शेतात आणले होते. या ठिकाणी आरोपीने मृतावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करून घटनास्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस अधिकारी व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी एका १६ वर्षे वयाच्या तरुणाची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवे ठार मारल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी रुग्णालयात रवाना केला.