ठाणे - एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ४ अनोळखी तरुणांनी भरदिवसा बदलापूर पश्चिम येथील घरच्या रस्त्याने जात असताना अपहरण केल्याची तक्रार मुलीने दाखल केली होती. मात्र त्या १६ वर्षीय विद्यार्थीनीने फिल्मी स्टाईलने रचलेला अपहरणाचा बनाव बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
'असा' केला अपहरणाचा गुन्हा दाखल
दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी कुटुंबासह बदलापूर पश्चिम परिसरात राहते. ती दादर - परळ भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. त्यातच 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास बदलापूर पश्चिम येथील गौरी इस्टेट कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने जात असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ४ अनोळखी तरुणांनी पाठीमागून येऊन नाकाला कपडा लावत बेशुद्ध करत कारमधून अपहरण केले. त्यानंतर कार मुंबईतील दादर भागात एका ठिकाणी थांबल्याने अपहरणकर्त्याच्या तावडीतून पळ काढून दादरला शाळेत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र वडील बाहेर असल्याने त्यांनी दादर येथील शाळेतील शिक्षिकेला माहिती दिली. तर घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षिकेने तिला घेऊन दादर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून अज्ञात ४ व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने दादर पोलिसांनी २४ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग केला.
...म्हणून रचला अपहरणाचा बनाव