ठाणे - विनाकारण भिती दाखवून रुग्णालयामध्ये अॅडमीट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बील आकारले म्हणून, पालिकेने ठाण्यातील 2 खासगी रुग्णालयाला दंड आकारला आहे. हा दंड तब्बल १६ लाख रुपयांचा आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई असून, गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या या रुग्णालयाविरोधात तक्रारी येत होत्या, त्याची शहनिशा करुन ठाणे महानगरपालिकेने ही कारवाई केली.
ठाण्यातील 2 रुग्णालयांना 16 लाखांचा दंड, अव्वाच्या सव्वा बिल आकारल्याप्रकरणी कारवाई - ठाण्यातील रुगण्लयांना दंड
विनाकारण भिती दाखवून रुग्णालयामध्ये अॅडमीट करुन घेतले आणि अव्वाच्या सव्वा बिल आकारले म्हणून, पालिकेने ठाण्यातील 2 खासगी रुग्णालयाला दंड आकारला आहे. हा दंड तब्बल १६ लाख रुपयांचा आहे.
कोणताही आजार नसताना ठाण्यातील दोन रुग्णालयांनी १३ ठाणेकरांना दाखल करुन घेतले होते. तसेच ७ दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखोंची बिले आकारली होती. याबाबत ठाणे महानगर पालिकेकडे तक्रार आल्यावर पालिकेने चौकाशी करुन या दोन रुग्णालयावर कारवाई केली.
नागरिकांची पिळवणूक करणे आणि त्या रुग्णालयावर कारावई होणे ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. यामुळे आता विनाकारण उपचार करणाऱ्या रुग्णालयांना चपराक बसली आहे. ठाण्यात याआधी देखील अशा तक्रारी आल्या होत्या. तसेच थायरो केअर नावाच्या एका लॅबला ठाणे महानगर पालिकेने सॅब टेस्ट न करण्याची नोटीस धाडली आहे. काही लॅबने सॅब टेस्ट केल्या होत्या, मात्र त्यांचे अहवाल हे चुकीचे आल्याने नागरिकांना मनस्ताप झाला होता. ठाणे महानगर पालिकादेखील अशा रुग्णालय आणि लॅबवर कारवाई करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका आहे असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.