नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश,झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी 5, झारखंडकरता 2, उत्तरप्रदेशकरता 2 तर बिहार आणि ओरिसा करता प्रत्येक एक-एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.
LOCKDOWN : पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना - पनवेल रेल्वे स्थानक
लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश,झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हेाती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.
पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना
रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हेाती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यात आले आहे.