ठाणे- घरातून गुपचूप निघून दिवसभर सायकलवर फिरून घरी परतलेल्या मुलावर आई ओरडल्याने रागातून एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील शांतीनगर चाळ नंबर १९ येथे घडली आहे, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक! आई रागवल्याने 14 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या - Sidharth Kamble
घरातून गुपचूप निघून दिवसभर सायकलवर फिरून घरी परतलेल्या मुलावर आई ओरडल्याने रागातून एका १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहम्मद जाफर उर्फ राजा जमील शेख (वय १४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. मृत मोहम्मद जाफर हा शनिवारी सकाळी घरातून सायकल घेऊन तो दिवसभर फिरून रात्री साडेनऊ वाजता घरी परतला. त्यामुळे आई फरजाना हिने तू दिवसभर कुठे फिरत होतास, असा सवाल करून त्याच्यावर ओरडली. यावरून मोहम्मद जाफर यास राग आल्याने त्याने घरातील दुसर्या रूममध्ये जाऊन लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक वामन भोईर करीत आहेत.