ठाणे- कल्याण-डोंबिवलीत आज आढळलेल्या १४ रुग्णांपैकी २ मुंबई पोलीस, २ आरोग्य कर्मचारी, १ मुबईतील खासगी कंपनीतील कर्मचारी तर ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहेत. मात्र, २ नवीन रुग्ण असून या रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध आरोग्य विभागाने सुरू केला आहे. तर महापालिका हद्दीतील आजपर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १९५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत नव्याने १४ कोरोनाबाधित रुग्ण; संख्या पोहचली १९५ वर - कोरोना ठाणे अपडेट
आज आढळून आलेल्या १४ रुग्णांपैकी ५ महिला व ९ पुरुषांचा समावेश आहे. मात्र, यामधील २ पुरुषांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. तर डोंबिवलीतील आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ तर कल्याणमध्ये ७ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
आज आढळून आलेल्या १४ रुग्णांपैकी ५ महिला व ९ पुरुषांचा समावेश आहे. मात्र, यामधील २ पुरुषांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. तर डोंबिवलीतील आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५ तर कल्याणमध्ये ७ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सध्याच्या स्थितीत १२७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत ६५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१) महिला ३२ वर्ष (कल्याण, प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
२) महिला ३० (कल्याण प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
३) पुरूष ३५ वर्षे (कल्याण प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
४) महिला ४४ वर्षे ( डोंबिवली पूर्व ) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
५) पुरूष ६६ वर्षे (कल्याण पूर्व)
६} पुरूष ३३ वर्ष ( डोंबिवली पूर्व) - मुंबई येथे खासगी कंपनीत कार्यरत
७) पुरूष ४४ वर्ष (डोंबिवली प.)- मुंबई येथे ट्रॅफिक पोलीस
८) महिला ३९ वर्ष (कल्याण प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
९) महिला २६ वर्षे (कल्याण प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
१०) पुरूष ३३ वर्ष (डोबिवली प.) - कोरोनाबाधित रुग्णाचा सहवासित
११) पुरूष ४२ वर्ष ( डोंबिवली प.) - मुंबई येथे शासकीय सेवेत कार्यरत
१२) पुरूष ५५ वर्षे (कल्याण प.) - मुंबई येथे शासकीय रुग्णालयात वाहन चालक
१३) पुरूष ३४ वर्षे (कल्याण प.)
१४) पुरूष ३६ वर्षे (कल्याण प.) - मुंबई येथे शासकीय रुग्णालयात पोलीस