नवी मुंबई - शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर गुरुवारी पुन्हा 12 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. नवी मुंबईत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 108 वर पोहोचली आहे.
नवी मुंबईत आणखी 12 कोरोनाबाधितांची वाढ, तिघांना मिळाला डिस्चार्ज - new corona positive cases in navi mumbai
समोर आलेल्या अहवालानुसार, नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आणखी एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत 52 वर्षीय सिस्टर्स इन्चार्ज महिलेचे रिपोर्टही गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या आणखी 9 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
![नवी मुंबईत आणखी 12 कोरोनाबाधितांची वाढ, तिघांना मिळाला डिस्चार्ज नवी मुंबईत आणखी 12 कोरोनाबाधितांची वाढ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6916623-463-6916623-1587694988142.jpg)
यातील 97 पॉझिटिव्ह रुग्ण हे नवी मुंबईतील आहेत. तर, अन्य 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत. 23 एप्रिलला नवी मुंबई परिसरात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढतच आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आणखी एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत 52 वर्षीय सिस्टर्स इंचार्ज महिलेचे रिपोर्टही गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईतील विविध भागात राहणाऱ्या आणखी 9 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, तो भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच गुरुवारी तीन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचीही माहिती मिळाली आहे.