महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्ण; रुग्णांची संख्या 129 वर - thane corona news

आज नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या 129 वर पोहोचली आहे. खळबळजनक बाब म्हणजे एकट्या डोंबिवलीत 79 रुग्ण असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर कल्याण परिसरात 42 रुग्ण तसेच टिटवाळा–मांडा 4 तर मोहने भागात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

कल्याण डोंबिवलीत  नव्याने 12  कोरोनाबाधित रुग्ण; रुग्णांची संख्या 129 वर
कल्याण डोंबिवलीत नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्ण; रुग्णांची संख्या 129 वर

By

Published : Apr 26, 2020, 4:51 PM IST

ठाणे -कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या 129वर पोहोचली आहे. खळबळजनक बाब म्हणजे एकट्या डोंबिवलीत 79 रुग्ण असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर कल्याण परिसरात 42 रुग्ण तसेच टिटवाळा–मांडा 4 तर मोहने भागात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रुग्णांची विगतवारी पाहता कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासीतील 4 रुग्ण आहेत, तर 4 रुग्ण मुंबई येथील आरोग्य कर्मचारी असून 2 मुंबई येथील पोलीस कर्मचारी आहेत. 1 रुग्ण मुंबई येथील एका वृत्तवाहिनीचा वार्ताहर आहे. मात्र, 2 रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.

1. महिला 50 वर्षे (डोंबिवली प.) कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीत.
2. मुलगी 12 वर्षे (मांडा‍ टिटवाळा)कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीत.
3. पुरुष 30 वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील आरोग्य कर्मचारी.
4. पुरुष 33 वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील आरोग्य कर्मचारी.
5. महिला 43 वर्षे (कल्याण पूर्व) मुंबई येथील आरोग्य कर्मचारी.
6. पुरुष 30 वर्षे (डोंबिवली प.) कोरोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासीत.
7. पुरुष 36वर्षे ‍(कल्याण प.) मुंबई येथील पोलीस कर्मचारी.
8. पुरुष 39 वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील, वृत्तवाहिनीचा वार्ताहर.
9. पुरुष 45 वर्षे (डोंबिवली प.)
10. महिला 16 वर्षे (डोंबिवली प.)
11. पुरुष 39 वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील पोलीस कर्मचारी.
12. महिला 52 वर्षे (मांडा टिटवाळा) मुंबई येथील आरोग्य कर्मचारी.

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील एकूण 129 रुग्णांपैकी 3 मृत्यू तर 40 रुगांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत एकूण 86 रुग्ण विविध विलगीकरण कक्षात दाखल असून तेथे उपचार घेत आहेत.

एकूण रुग्णांची विगतवारी खालीलप्रमाणे -


कल्याण पूर्व -27

कल्याण पश्चिम -15


डोंबिवली पूर्व -47

डोंबिवली पश्चिम -32


मांडा टिटवाळा - 4

मोहने -4

ABOUT THE AUTHOR

...view details