महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियम तोडून धबधब्यावर गेलेल्या 117 पर्यटकांना पाण्याने वेढले, अग्निशामक दलाने केली सुटका - water fall water

रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी असल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. मात्र, दुपारी १२ नंतर मुसळधार पावसामुळे धबधब्याच्‍या पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढू लागला. त्यामुळे तेथील पर्यटकांना धबधब्याचा प्रवाह ओलांडून सुरक्षित स्थळी जाणे अशक्य झाले. या ठिकाणी तब्बल 117 पर्यटक अडकले होते.

नियम तोडून गेलेल्या 117 पर्यटकांना धबधब्याच्या
नियम तोडून गेलेल्या 117 पर्यटकांना धबधब्याच्या

By

Published : Jul 19, 2021, 12:09 PM IST

Updated : Jul 19, 2021, 12:39 PM IST

नवी मुंबई-खारघर मधील पांडवकडा धबधबा हा धोकादायक धबधबा म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे. या धबधब्यावर जाऊ नये म्हणून पोलिसांकडून प्रवेश बंदी आदेश देखील जारी केलेला आहे. मात्र वर्षा पर्यटानाचा आनंद घेण्यासाठी रविवारी तब्बल 117 पर्यटक नियम मोडून या गोल्फ क्लब परिसरातील धबधब्यावर गेले होते. पंरतु अचनाक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आणि हे सर्व पर्यटक अडकून पडले. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करून या पर्यटकांची सुटका केली आहे.

धबधब्यावर गेलेल्या 117 पर्यटकांना पाण्याने वेढले
धोकादायक धबधबा असल्याने पोलिसांनी घातली होती बंदी-
खारघर मधील पांडवकडा व जवळपास असणारे सर्वच धबधबे धोकादायक असून, या धबधब्यात वाहून जाऊन, अथवा पडून कित्येकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला कोणीही पांडवकडा धबधबा परिसरात जाऊ नये, असे पोलीस आणि प्रशासनाने परिपत्रक काढले होते. या पर्यटन परिसरात नागरिकांना मज्जाव असल्याचे फलकही धबधबा परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून नागरिक या पर्यटनस्थळाला भेटी देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पोलिसांची नजर चुकवून धबधब्यावर गेले होते-
शनिवारी रात्रीपासून पनवेल, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक नियमबाह्य पद्धतीने खारघर येथील धबधब्यावर गेले होते. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी असल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. मात्र, दुपारी १२ नंतर मुसळधार पावसामुळे धबधब्याच्‍या पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढू लागला. त्यामुळे तेथील पर्यटकांना धबधब्याचा प्रवाह ओलांडून सुरक्षित स्थळी जाणे अशक्य झाले. या ठिकाणी तब्बल 117 पर्यटक अडकले होते. त्यातच पावसाचा जोर वाढत होता. अडकलेल्या पर्यटकांमध्ये ७८ महिला, ३७ पुरुष आणि ५ मुलांचा समावेश होता.
नियम तोडून गेलेल्या 117 पर्यटकांना धबधब्याच्या
अखेर अडकलेल्या लोकांचं केलं रेस्क्यू ऑपरेशन-
खारघर परिसरात धबधब्यावर चोरून गेलेल्या त्या लोकांना पाण्याचा प्रवाह कमी होईल आणि आपण बाहेर निघू असे वाटत होते, त्यामुळे ते वाट पाहत होते, मात्र पाण्याचा प्रवाह कमी होण्याऐवजी वाढतच राहिला. त्यानंतर त्यातील काही पर्यटकांनी आपतकालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खारघर अग्निशमन फोन करून धबधब्याजवळ पर्यटक अडकल्याची माहिती दिली. अग्निशामक दलाला मिळालेल्या माहिती नुसार आणि घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्कळा पोलीस दलास या बाबतची माहिती देऊन त्यानंतर पोलीस पथकासह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व ३५ फुटांची शिडी आडवी करून जोखमीने अग्निशमन दलाच्या जवानांनी एक एक करत ११७ लोकांना सुखरूप बाहेर काढले.
Last Updated : Jul 19, 2021, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details