ठाणे - भिवंडीच्या काल्हेर परिसरातील एका गोडाऊनवर छापेमारी करीत तस्कऱ्या विकास प्रेमशंकर चौबे उर्फ छोटा पंडीत याला पोलीस पथकाने अटक केली आहे. ( Smuggler Who Raided Godown In Bhiwandi ) पोलीस पथकाने या छापेमारीत 350 किलो गांजा, मोबाईल, रोख रक्कम असा 35 लाख 3 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल - अमली पदार्थ तस्करीबाबत कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस पथक करीत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंबालाल जगदिश जाट रा. दिपज्योती रेसिडेन्सी, काल्हेर, भिवंडी याच्यावर अमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच्याकडून त्यावेळी पोलिसांनी ११० किलो गांजा हस्तगत केला होता.