ठाणे - वडिलांनी खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग मनात धरून उल्हासनगर जवळील म्हारळ गावात ११ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साहिल मांढरे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो इय्यता ६वीत शिकत होता.
संतोष मांढरे यांचा मुलगा साहिल काल दुपारी शाळेतून घरी आला असता त्याने वडिलांना खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल न देता 'अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नकोस', असा दम दिला. त्यानंतर साहिलने रागाच्या भरात घरातील बाथरुमच्या खिडकीला नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धक्कादायक! खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या - boy commits suicide after father refuses to give mobile
संतोष मांढरे यांचा मुलगा साहील काल दुपारी शाळेतून घरी आला असता त्याने वडिलांना खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यावेळी वडिलांनी त्याला मोबाईल न देता 'अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नकोस', असा दम दिला. त्यानंतर साहिलने रागाच्या भरात घरातील बाथरुमच्या खिडकीला नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत साहिल मांढरे
हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
दरम्यान, साहिलच्या शिक्षकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, साहील हा खेळाडूवृत्तीचा आणि मनमिळावू स्वभावाचा विद्यार्थी होता. त्याचे या वयात जाणे ही मनाला वेदना देणारी बाब आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.