ठाणे - आज चौथ्या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानप्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये आज १०१ वर्षाच्या आजीने मतदान केले आहे. आताच्या पिढीनेदेखील राष्ट्राच्या हितासाठी मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ठाण्यात १०१ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क
मंजुळा चेंगविलकर असे या आजीचे नाव आहे. आज त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसोबत आल्या होत्या.
मतदानाच्या हक्क बजावलेल्या आजीबाई
मंजुळा चेंगविलकर असे या आजीचे नाव आहे. आज त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसोबत आल्या होत्या. अशा वृद्ध मतदारांचा उत्साह बघून तरी मतदान न करणाऱ्यांना जाग येईल का? असेही यावेळी बोलले जात होते.