ठाणे -लहान वयात नेव्ही चे स्वप्न पाहणाऱ्या 10 वर्षीय चिमुरडीने 38 दिवसात 3600 किलोमीटरचा सायकल प्रवास करून एक नवीन विक्रम केला ( Thane Girl Kashmir To Kanyakumari Bycle Travel ) आहे. ठाण्यातील जलपरी या नावाने लोकप्रिय असणाऱ्या सई आशिष पाटील ने पोहण्याचे आधीच विक्रम केले होते. मात्र, वडिलांच्या आवडीनुसार सायकलिंग सुरू केल्यावर तिने आता जगाला सायकलवरून फिरायचे ठरवले आहे.
ठाण्यातील श्रीमा शाळेत 5 वी मध्ये शिकणाऱ्या सईने वयाच्या सहाव्या वर्षी पुलवामा हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत ठाण्याच्या खाडीवरून १०० फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता. सई सहा वर्षाची असताना तिने कंसाचा खडक ते उरण हे ११ किमीचे अंतर एक तासात पूर्ण केलेले. याबद्दल तिचा अनेकांनी सत्कार केला असून, तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. सईचा खूप अभिमान वाटतो, संपूर्ण देशात तिचा नावलौकिक झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना अशी शिकवण देऊन खंबीरपणे मागे उभं राहिले पाहिज, असे सईचे आईवडील म्हणाले.
38 दिवसांत साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास
सईने १६ डिसेंबर २०२१ रोजी काश्मीर मधील कटरा येथील पवित्र वैष्णो देवीच्या प्रवेशद्वारापासून कन्याकुमारीच्या प्रवासास प्रारंभ केला. सुमारे ३६३९ किमी चा हा प्रवास तिने अवघ्या ३८ दिवसात पूर्ण केला. सुमारे ३६३९ किमीचा हा प्रवास तिने अवघ्या ३८ दिवसांत पूर्ण केला. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या, मात्र न डगमगता खंबीर पणे हा विक्रम सईने पूर्ण केला. यापुर्वीही सईने ठाणे महापौर जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक, फ्रीस्टायल, बटरफ्लाय, बेस्ट्रोक स्पर्धेत पदक पटकावली आहेत. क्षेत्र कार्ल ते बाळकूम ठाणे हा १२० किमी चा प्रवास फक्त सहा तासांत पूर्ण केला आहे. तसेच, भारत मातेच्या संरक्षणार्थ वीरमरण आलेल्या शाहिद जवानांना श्रद्धांजली समर्पित करीत कारगिल ते श्रीनगर हा २२० किमी चा यशस्वी सायकल प्रवासही तिने केला आहे.
लोकांच्या मदतीने ऊर्जा मिळाली
जवळपास साडेतीन हजार किलोमीटरचा हा प्रवास करत असताना सही आणि सईच्या कुटुंबियांना देशभरातील नागरिकांनी जो प्रतिसाद दिला, त्यामुळे एक मोठी ऊर्जा निर्माण झाली आणि यामुळेच आत्मविश्वास वाढला आणि हा संपूर्ण प्रवास घडला, असे कुटुंबीय सांगत आहेत.
विदेशात ही घेतली सईची दखल
सईने केलेल्या कामगिरीची दखल लिम्का बुक ने ही घेतली आहे. एवढ्या लहान वयात केलेल्या कामगिरीचा आढावा पुराव्यासह मागवून घेतला आहे. आता 7000 किलोमीटरच्या रेस मध्ये सायकल चालवण्याचे जवळचे लक्ष आता सई ने ठेवले आहे,. त्यासाठी फ्रांस मधून दररोज ऑनलाइन मार्गदर्शन ही सईला मिळत आहे.
हेही वाचा -Nana Patole on MLAs Suspension Cancellation : विधानसभा ही सार्वभौम; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया