महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामध्ये लेप्टोस्पायरोसीसचे संकट; २० दिवसात दहा जणांचा लेप्टोस्पायरोसीसमुळे मृत्यू

कोरोनाचे संकट सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील सापगाव येथे लेप्टोस्पायरोसीसचा देखील धोका बळावला आहे. २० दिवसांत लेप्टोस्पायरोसीसमुळे १० ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीष रेघे यांनीही हे मृत्यू लेप्टोस्पायरोसीसनेच झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

leptospirosis spread in shahapur
सापगाव लेप्टोस्पायरोसीस फैलाव

By

Published : Nov 21, 2020, 1:33 PM IST

ठाणे - कोरोनाचे संकट सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील सापगाव येथील १० ग्रामस्थांचा २० दिवसांत लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीष रेघे यांनीही हे मृत्यू लेप्टोस्पायरोसीसनेच झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसीसचे उपचार सुरू
शहापूर तालुक्यातील या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांची आरोग्यतपासणी सुरू केली आहे. त्यात डेंग्यूच्या तुलनेत लेप्टोस्पायरोसीस या आजाराची लक्षणे जास्त आढळून आली आहेत. त्वरित आरोग्य शिबिर सुरू करून ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसीसचे उपचार सुरू केल्याचे डाॅ. रेघे यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू
या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्रामस्थांना विविध साथीच्या आजारांनी ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरू करण्याची मागणी केली. त्यास अनुसरून आता या गावात आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details