महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Traffic Route Change In Thane: ठाण्यात मेट्रो गर्डरसाठी १० दिवस वाहतुकीत बदल; जाणून घ्या नवीन मार्ग... - घोडबंदर परिसरात मेट्रो लेन ४

ठाण्यातील मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू असून घोडबंदर रोडवरील गर्डर टाकण्यासाठी तब्बल १० दिवसांसाठी प्रत्येकी ५ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे वाहतूक पोलीस शाखेकडून वाहतुकीच्या मार्गिकांमध्ये बदल करण्यात आला आहे. १८ जुलै पर्यंत १० दिवस रात्री १२ ते सकाळी ५ वाजपर्यंत ठाणे ते घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

Traffic Route Change In Thane
ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

By

Published : Jul 8, 2023, 10:51 PM IST

ठाणे :घोडबंदर परिसरात मेट्रो लेन ४ चे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक ही मंदगतीने सुरू राहील. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपा-आनंदनगर दरम्यान गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. परिणामी, नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सदरची वाहतूक अधिसूचनेवर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे. तसेच हे आदेश वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त विनकुमार राठोड यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.


असा आहे बदल:
- प्रवेश बंद : १) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
- पर्यायी: अ) सदरची वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) सदरची वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेऊन कशेळी, अजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

- प्रवेश बंद: २) मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग: सदरची वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडो ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.


या ठिकाणी असणार प्रवेश बंद:
(३) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदरची वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेऊन अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मानपाडा काम करताना मानपाडा ब्रिजखालून घोडबंदर रोडचे दिशेने जाणारी वाहने मानपाडा ब्रिज ते टिकुजीनीवाडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन निळकंठ ग्रीन सोसायटी मार्गे मुल्ला बाग येथून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.
- आनंदनगर येथे काम करताना डि मार्ट जवळून सेवा रस्त्याने पुढे आनंदगनर सिग्नल जवळ उजवे बाजूस वळण घेऊन मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details