बदलापूर (ठाणे) - कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून काल एकाच दिवशी तब्बल 10 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या 10 रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 85 चा आकडा गाठला आहे. यापैकी आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर 61 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बदलापूर शहरात एकाच दिवशी 10 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ - lockdown in india
एकाच दिवशी तब्बल 10 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या 10 रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 85 चा आकडा गाठला आहे. यापैकी आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर 61 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बदलापूर शहरात एकाच दिवशी 10 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
या 10 रुग्णांमध्ये पूर्वेतील सूर्याविहारमधील 3, कात्रप 2 (अष्टविनायक वास्तू, गोकुळ आवास प्रत्येकी 1) पश्चिमेतील मोतीबाई टॉवर 1, बेलवली 1, सोनम अपार्टमेंट 1, वालीवली नाका 1 आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. बधितांमध्ये 6 रुग्ण पहिल्या बाधित झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तर, 4 रुग्ण मुंबईमध्ये काम करणारे आहेत. एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनचे नियम अधिक तीव्र करण्याची मागणी जाणकार व्यक्त करत आहेत.