ठाणे- नवीन वर्षानिमित्त १ जानेवारीला पहाटेपर्यंत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो. तरुण तरुणी यादिवशी मोठ्या प्रमाणाता पार्ट्यांचे आयोजन करतात. यातच एका तरुणाच्या जीवावर नवीन वर्षाची पार्टी बेतली असती. मात्र, भिवंडीतील दोघांनी त्याचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा ग्रामपंच्यात हद्दीत घडली.
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून भिवंडीतील पत्रकार अमृत शर्मा आणि त्यांचा मित्र कल्लू भाई ये दोघेही भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा गावातून घराच्या दिशेने निघाले. यावेळी पहाटेचे दीड ते दोन वाजले होते. यावेळी त्यांना एका दुचाकीखाली तरुणाचा पाय दिसला. त्यांनतर अमृत शर्मा यांनी स्थानिक नारपोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ठाण्यावरून एक रुग्णवाहिका येत असून त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करावे, असे शर्मा यांना सांगितले.