महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीतील फ्लिपकार्डच्या गोदामात १ लाखांची चोरी - theft in flipkart company godown bhiwandi thane

दोन्ही आरोपींनी या फ्लिपकार्ड कंपनीच्या गाळा नं. २२७ मधून मोबाईल संच, नामांकित कंपनीचे शूज, जीन्स पॅन्ट असा १ लाख ७७७ रुपयांच्या वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली. गोदामातील चोरीची घटना व्यवस्थापक अभिजित लक्ष्मण कदम (वय - २९, रा.ठाणे) यांच्या निदर्शनास आली.

narpoli police station, bhiwandi
नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी

By

Published : Dec 24, 2019, 7:49 PM IST

ठाणे -फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामातून मोबाईल, शूज, जीन्स पॅन्ट असा सुमारे एक लाखाहून अधिक किंमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी तिथे काम करणाऱ्या 2 कामगारांनी संगनमताने केली. याप्रकरणी याप्रकरणी नारपोली पोलिसांनी या चोरट्या कामगारांना अटक केली आहे.

ही घटना भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथील फ्लिपकार्ड कंपनीच्या गोदामात घडली आहे. ही कंपनी इंडियन कॉर्पोरेशनच्या कम्पाऊंडमधील अमेट टेक्नो लॉजिस्टिक कंपनी अंतर्गत चालवली जाते. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी या चोरट्या कामगारांना अटक केली आहे. कुणाल गणपत पाटील (वय - २४, रा.पहारे) आणि सदानंद बाबुनाथ म्हात्रे (वय - ३६, रा. हायवेदिवे) असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत.

हेही वाचा -नाशिकमध्ये दामदुप्पटच्या नावाने लष्करी अधिकाऱ्यांना ४७ लाखांचा गंडा

दोन्ही आरोपींनी या फ्लिपकार्ड कंपनीच्या गाळा नं. २२७ मधून मोबाईल संच, नामांकित कंपनीचे शूज, जीन्स पॅन्ट असा १ लाख ७७७ रुपयांच्या वस्तू चोरून त्यांची परस्पर विक्री केली. गोदामातील चोरीची घटना व्यवस्थापक अभिजित लक्ष्मण कदम (वय - २९, रा.ठाणे) यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर पोलीस हवालदार अशोक बोडके यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details