महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tobacco And Panmasala Stock Seized : एक कोटी आठ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा टेम्पोसह जप्त - Tobacco And Panmasala Stock Seized

प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याची वाहतूक (Prohibited transport of tobacco and vegetables) करणाऱ्या टेम्पोसह मडक्याचा पाडा हद्दीत सापळा रचून अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने (Department of Food and Drug Administration) जप्त केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल (Case filed against Gutkha Mafia) करण्यात आला आहे. Latest news from Thane, Thane Crime

Tobacco And Panmasala Stock Seized
प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा टेम्पोसह जप्त

By

Published : Nov 23, 2022, 7:32 PM IST

ठाणे : गुजरात मार्गे वाडा भिवंडी मार्गावरून एका टेम्पोतून एक कोटी आठ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याची वाहतूक (Prohibited transport of tobacco and vegetables) करणाऱ्या टेम्पोसह मडक्याचा पाडा हद्दीत सापळा रचून अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने (Department of Food and Drug Administration) जप्त केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल (Case filed against Gutkha Mafia) करण्यात आला आहे. टेम्पो चालक परमेश्वर ढाकरगे, टेम्पो मालक राजेश शेटीया, तसेच गुटखा माफिया राजकुमार सपाटे, शौकत पठाण, राजेश गुप्ता यांच्यासह दोन अश्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. Latest news from Thane, Thane Crime

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई -वाडा-भिवंडी मार्गवरील मडक्याचा पाडा परिसरात प्रतिबंधित पदार्थ मुंबई-ठाण्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची खबर ठाणे अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलीस पथकासह या मार्गावर सापळा रचून एक टेम्पो अडविला. त्यावेळी या टेम्पोमध्ये पथकाला प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू आढळून आला. हा साठा १ कोटी ८ लाख ९७ हजार ५२० रुपयांचा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिली.


टेम्पोचालकाची कबूली -अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव परमेश्वर ढाकरगे असल्याचे समोर आले. तसेच त्याने हा प्रतिबंधक गुटखा टेम्पोचा मालक, राजेश शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत पठाण, राजेश गुप्ता यांनी सांगितलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला आणल्याची कबूली दिल्याने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी टेम्पोचे नोंदणी प्रमाणपत्रास टेम्पो चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागात पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details