महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परितेवाडीत युवकाचा तीक्ष्ण हत्याराने खून - माढा हत्या बातमी

माढा तालुक्यातील परितेवाडी येथे एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात युवकाविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मृत सिद्धेश्वर
मृत सिद्धेश्वर

By

Published : Dec 26, 2020, 4:57 PM IST

Updated : Dec 26, 2020, 5:23 PM IST

पंढरपूर (सोलापूर)- माढा तालुक्यातील परितेवाडी गावात अज्ञात मारेकर्‍यांनी तीक्ष्ण हत्याराने युवकाच्या डोक्यात वार करत निर्घृण हत्या केली. सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय 21 वर्षे, रा. परितेवाडी, ता. माढा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी परितेवाडीचे पोलीस पाटील जिंदास बाळू हराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात 25 डिसेंबरला अज्ञाताविरोधात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली मृताची ओळख

परितेवाडी गावातील काही युवक मळ्यावरच्या सारीमध्ये गेले असताना तिथे त्यांना एका युवकाचा रक्ताळलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला दिसला. त्या युवकांनी परितेवाडी गावचे पोलीस पाटील जिंदास हराळे यांना फोनद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील हराळे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत माहिती दिली.

सिद्धेश्वर जाधव शुक्रवारी घरी आला नव्हता

सिद्धेश्वर जाधव हा कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे घरी सांगून निघाला होता. मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत सिद्धेश्वर हा घरी परतलाच नव्हता, अशी माहिती भाऊ बालाजी जाधव यांनी दिली.

हेही वाचा -खोट्या सह्यांद्वारे केली ३ कोटी ६० लाखांची फसवणूक; दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा -सोलापूर हैदराबाद महामार्गावर कांद्याचा ट्रक लुटणारे पाच दरोडेखोर गजाआड

Last Updated : Dec 26, 2020, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details