महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

March At Solapur Collectorate : 'लग्नासाठी मुलगी देता का हो, मुलगी...'; लग्नाळू तरुणांचा मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - गर्भलिंगनिदान कायदा

सोलापूर जिल्ह्यात गर्भलिंगनिदान कायद्याची (Fertility diagnosis law) कडक अंमलबजावणी न झाल्याने सोलापूरच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत (non availability of girls for marriage) नाही. लग्नाचे वय निघून चालले आहे. वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या (increasing expectations of the bridegroom) आहेत. मुलांना कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो अशी विविध कारणे मुलींच्या घरच्यांकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे आमचे लग्नाचे वय निघून चालले आहेत. आम्हाला लग्नासाठी एखादी मुलगी द्या अशी प्रमुख मागणी करत क्रांती ज्योती परिषदेमार्फत घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर इच्छुक नवरदेवांनी मोर्चा (march of bridegrooms on the collector office) काढला होता. हा अनोखा मोर्चा पाहण्यासाठी सोलापुरात एकच गर्दी झाली होती. (Latest news from Solapur), (Kranti Jyoti Parishad)

March At Solapur Collectorate
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By

Published : Dec 21, 2022, 5:11 PM IST

Updated : Dec 21, 2022, 9:06 PM IST

लग्नाळू तरुणांचा मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर : क्रांती ज्योती परिषदेचे (Kranti Jyoti Parishad) प्रमुख रमेश बारसकर यांनी माहिती देताना सांगितले की, देशातील फक्त केरळ राज्यात मुलींची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र राज्यात हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी होत चालली आहे. सोलापूर जिल्ह्यातील देखील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारने यासाठी पीसीपीएनडीटी कायदा आणला आहे. पण या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत (non availability of girls for marriage) नाही. मोहोळ तालुक्यातील इच्छुक नवरदेवांनी विविध मागण्या करत शहरातील होम मैदानावर एकत्र येत, घोड्यावर बसून वरात काढली (march of bridegrooms on the collector office) आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नवरदेवांची मिरवणूक : जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर वरात काढत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. आम्हाला मुलगी द्या, समाजात मुली न मिळण्याची समस्या आहेत, त्या अडचणी दूर करा अशा विविध मागण्या करत माथ्यावर मांडावळ्या बांधून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवांकडून माहिती घेतली असता शिक्षण झाले, शेती करतो, लग्नाचे वय झाले तरीही मुलगी मिळत नाही अशी खंत व्यक्त केली.

Last Updated : Dec 21, 2022, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details