सोलापूर - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक अत्याचारामध्ये बळी पडलेल्या पीड़ितेला युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेलच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर (पार्क चौक) येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
हाथरस प्रकरण : पीडितेस सोलापुरात वाहिली श्रद्धांजली - solapur youth congress agitation
हाथरस येथील सामूहिक अत्याचारामध्ये बळी पडलेल्या पीड़ितेला युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेलच्यावतीने सोलापुरात श्रद्धांजली वाहण्यात आली. या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेलच्यावतीने करण्यात आली.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिकपणे अमानुष बलात्कार करण्यात आला. तीला मारहाण करून झालेल्या अत्याचाराची तीने कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभही कापण्यात आली. जवळपास 9 दिवस पोलिसांनी कोणतीच करवाई केली नाही. तिला गंभीर अवस्थेत असताना देखील योग्य ते उपचार मिळाले नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिच्या यातना कमी झालेल्या नाहीत. उत्तर प्रदेशमधील (योगी) सरकारने जोर जबरदस्ती करून त्या मुलीच्या परिवाराच्या अनुपस्थितीमध्ये त्या मुलीचा अंत्यविधी उरकण्यात आला. याचा आम्ही निषेध करतो आणि तिला श्रद्धांजली अर्पण करत आहे. नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेस व प्रियदर्शनी सेलच्यावतीने करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमीत भोसले, प्रियदर्शनी सेल प्रमुख श्रद्धा हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, दक्षिण सोलापुर अध्यक्ष सैफन शेख, गोविंद कांबळे, रानी वाघमारे, विवेक इंगळे, संजय गायकवाड, राजेंन्द्र शिरकुल, सचिन शिंदे, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, विश्वास गज्जम, रोहित भोसले, श्रीवेणी आड़म, साक्षी गवळी, प्रगती डोंगरे, उमर मुकेरी, आनंद भंडारे, सचिन हेगाडे, प्रकाश नाइकवाडी, सौरभ सालुंखे, श्रीनिवास परकीपंडला, संजय फरड, शंकर माडेकर, आश्विनकुमार आतकरे, मुजाहिद जमादार यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.