सोलापूर -एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतन बारच्या शेजारी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास बेवासर मृतदेह आढळला होता. संबधित मृतदेह दत्ता लक्ष्मण खंदारे (वय 30) चा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वायर चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून दत्ता लक्ष्मण खंदारेचा बांधकाम साईटवरील एका वॉचमनने खून केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मृताचा मावस भाऊ सोनी अनिल देडे (वय 25) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अंबादास साखरे व त्याचे तीन अनोळखी साथीदार, असे चार आरोपी या खुनात शामिल आहेत.
सोलापूरात वायर चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या
वायर चोरल्याच्या क्षुल्लक कारणावरून दत्ता लक्ष्मण खंदारेचा बांधकाम साईटवरील एका वॉचमनने खून केल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मृताचा मावस भाऊ सोनी अनिल देडे (वय 25) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अंबादास साखरे व त्याचे तीन अनोळखी साथीदार, असे चार आरोपी या खुनात शामिल आहेत.
आरोपी अंबादास साखरे हा चेतन बार(हॉटेल ) च्या पाठीमागील बांधकाम साईटवर वॉचमनची नोकरी करतो. बांधकाम साईटवरून वायर चोरीला गेली होती. वॉचमनने वायर चोरल्याचा आरोपावरून आपल्या तीन साथीदारांसह 12 जुलैला दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दत्ताला मारहाण केली होती. या मारहाणीत दत्ता खंदारे जबर जखमी झाला होता. दत्ताचा मावस भाऊ सोनी देडे याने ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. दोन हजार रुपये आणून देतो, पण मारू नका अशी विनंती त्याने वॉचमन अंबादास साखरेला केली.
दरम्यान मारहाणीत दत्ता जबर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी घेऊन न जाता बांधकामावरच जखमी अवस्थेत ठेवले होते. शेवटी जखमी दत्ताने जागीच प्राण सोडले. वॉचमन अंबादास साखरे व त्याच्या तीन साथीदारांनी दत्ता याचा मृतदेह चेतन बारच्या पाठीमागील झाडा झुडपात फेकला आणि तेथून निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बेवारस मृतदेह समजून ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यामधून खून झाल्याचे निष्पन्न झाले. वॉचमन सहित तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या खुनाचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त ताकवले करत आहेत.