सोलापूर- करमाळा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे काम मी तुमच्या जिवावर करू शकलो. त्यामुळे मी तुमचा शतश: आभारी आहे. शिवसेनेच्या उमेदवारीचा मी हक्कदार असताना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या उमेदवारीवर सकारात्मक होते. मात्र, केवळ पैशांच्या जीवावर माझी उमेदवारी बदलण्याचे कटकारस्थान मंत्री तानाजी सावंत यांनी केले, असे अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी करमाळ्यातील सभेत बोलताना केले.
तुम्ही मला माझ्या विकास कामांमुळे नाकारणार नाही - नारायण पाटील - Narayan Patil Shiv Sena candidancy
शिवसेनेच्या उमेदवारीचा मी हक्कदार असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्या उमेदवारीवर सकारात्मक होते. मात्र, केवळ पैशांच्या जीवावर माझी उमेदवारी बदलण्याचे कटकारस्थान मंत्री तानाजी सावंत यांनी केले, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी करमाळा सभेत बोलताना केले.
त्याचबरोबर, सभेमधील जनतेची उपस्थिती पाहून जनत मला नकारणार नाही. ते मला अपक्ष म्हणून निवडून देतील, असा विश्वास देखील नारायण पाटील यांनी सभेमध्ये व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, मी शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, मंत्री तानाजी सावंत यांनी कारखाने घालवण्यासाठी माझ्या उमेदवारीवर अन्याय केला. तरी शिवसेनेचे मंत्री देसाई, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार शेवाळे यांनी मदत केली तर चंद्रकांत पाटलांनी पोरासारखे प्रेम केले.
हेही वाचा-निष्ठावंतांना डावलून चालणार नाही, आम्ही चिंतन करू - मुनगंटीवार