सोलापूर -मला सत्ता आणि पदाची लालसा असती तर मी काँग्रेस पक्ष कधीच सोडला असता. केवळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आहे, असे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे. अक्कलकोट रोडवरील रमणनगर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. शहर मध्यच्या विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी शहर मध्यमधुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सत्तेची लालसा असती तर कधीच पक्ष सोडला असता - प्रणिती शिंदे - सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ
मला सत्ता आणि पदाची लालसा असती तर मी काँग्रेस पक्ष कधीच सोडला असता. असे प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रणिती यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे.
यावेळी प्रणिती यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी शहरासाठी अनेक विकासाची कामे केली. उजनी-सोलापूर जलवाहिनीची योजना त्यांनीच आणली. त्यामुळे शहरासाठी पाण्याची सोय झाली. पण आता परिस्थिती वेगळीच आहे. उजनीत मुबलक पाणीसाठा असूनही शहराला सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून हद्दवाढ भागाचा विकास रखडला आहे. केंद्र, राज्य व मनपात सत्ता असूनही विकास कामे होत नाहीत. सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. अशा मंडळींनी सुशीलकुमार शिंदे यांना साथ दिली नाही तर तुम्हाला साथ कशी देणार असा सवालही त्यांनी केला.