महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरातील कामगारांनी काळे झेंडे घरावर लावून केंद्र सराकरचा केला निषेध - Workers Protest Solapur

आज सकाळी १० वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल बावटा कार्यालय येथे मोदी सत्तेचा निषेध दिवस आणि काळा दिवस पाळण्यात आला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, तसेच केंद्र सरकार राबवत असलेले जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा निषेध नोंदवण्यात आला.

Marxist Communist Party Black Day Solapur
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काळा दिवस लाल बावटा

By

Published : May 26, 2021, 4:01 PM IST

सोलापूर -केंद्र सरकारने रेल्वे, विमान यांसारख्या इतर सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खासगीकरण केले. नोटबंदी, शेतकरी व कामगारविरोधी कायदे पारित केले. भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे, सरकारच्या विरोधात २६ मे हा दिवस निषेध दिन आणि देशव्यापी काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्धार केलेला होता. त्या अनुषंगाने सोलापुरातील कामगारांनी काळे वस्त्र, काळी फिती, काळे झेंडे आपल्या घरावर लावून केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केल्याची माहिती कामगार नेते व माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिली.

बोलताना माजी आमदार नरसय्या आडम

हेही वाचा -सोलापुरात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक

मोदी सत्तेचा काळा दिवस पाळण्यात आला

आज सकाळी १० वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल बावटा कार्यालय येथे मोदी सत्तेचा निषेध दिवस आणि काळा दिवस पाळण्यात आला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ, तसेच केंद्र सरकार राबवत असलेले जनता विरोधी प्रतिगामी धोरणांच्या विरोधात देशव्यापी काळा दिवस पाळण्याची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा सचिव एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सत्तेचा निषेध दिवस पाळण्यात आला.

विडी उद्योग आणि यंत्रमाग उद्योग सुरू करा

माजी आमदार आडम म्हणाले की, सोलापूरची परिस्थिती अत्यंत भयावह व बिकट झालेली आहे. लोक अन्नधान्य, आरोग्य, महागाई आणि महामारीच्या वणव्यात जळत आहेत. याबाबत राज्य शासनाकडे दररोज पत्र व्यवहार, प्रत्यक्ष भ्रमणध्वनी वरून संवाद सुरू आहे. सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणारी दोन चाके विडी व यंत्रमाग उद्योग १ जूनला सुरू करण्याबाबत पालकमंत्री यांनी आश्वासन दिले आहे. तसे न झाल्यास १० हजार विडी व यंत्रमाग कामगारांना घेऊन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा वज्रनिर्धार कामगारांनी केलेला आहे. हे आंदोलन जर दडपून टाकण्याचा पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाकडून प्रयत्न होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मग आमच्यावर लाठी चालवा, गोळ्या झाडा, तुरुंगात टाका, आम्ही मागे हटणार नाही.

आमच्यावर उपकार नको, आम्हाला रोजगार द्या

मायबाप सरकार आमच्यावर उपकार नको, तर आम्हाला आमचा रोजगार द्या. आम्ही गुलाम अथवा भिकारी नसून आम्हाला स्वाभिमानाने जगू द्या, अशी लोकभावना यावेळी आडम यांनी व्यक्त केली. यावेळी निषेध पत्रक दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, सलीम मुल्ला, अनिल वासम, शकुंतला पाणीभाते, अशोक बल्ला, अकिल शेख ,अनिल वासम आदी उपस्थित होते.

हेही वाचा -मोहोळ तालुक्यात वाळू तस्करांवर मोठी कारवाई, 98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details