महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेमडेसिवीरसाठी महिला रडत पोहोचली नियोजन भवनात; इंजेक्शन वाटपाचा भोंगळ कारभार - सोलापूर कोरोना बातमी

रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शने वाटपाची जबाबदारी घेतली आहे. मात्र, एका महिलेस मागील तीन दिवसांपासून इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने अखेत त्या महिलेने रडत नियोजन भवन गाठले आणि थेट पालकमंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी केली.

पालकमंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी करताना महिला
पालकमंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी करताना महिला

By

Published : Apr 18, 2021, 5:19 PM IST

Updated : Apr 18, 2021, 6:54 PM IST

सोलापूर- रेमडेसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शने वाटपाची जबाबदारी घेतली आहे. पण, सरकारी काम सहा महिने थांब अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रेमडेसिवीर वाटपाची जबाबदारी घेतलेल्या अधिकाऱ्यांना एकाही रुग्णांच्या नातेवाईकास रेमडेसिवीर वेळेवर दिले जात नाही, अशी तक्रार अनेकजण करत आहेत. तसेच एक महिला नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपची जबाबदारी उचललेल्या प्रशासकीय (एफडीइ) विभागात तीन दिवसांपासून हेलपाटे मारत आहे. मात्र, इंजेक्शन मिळाले नाही. शेवटी ती महिला रविवारी (दि. 18 एप्रिल) सात रस्ता येथील नियोजन भवन गाठले. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून रेमडेसिवीरची मागणी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ताबडतोब रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आदेश दिला.

रेमडेसिवीरसाठी महिला रडत पोहोचली नियोजन भवनात

महिलेच्या बहिण व भावोजींसाठी हवे होते रेमेडसिवीर

संबंधित महिला ही मुळची सोलापूरची असून तीची बहिण पंढरपुरात वास्तव्यास आहे. आठ दिवसांपूर्वी तिच्या बहिणीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 13 एप्रिलपासून त्या महिलेची बहिण व भावोजी कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचले आहे. यामुळे त्यांना रेमडेसिवीरची गरज आहे. पण, सोलापुरात कुठेच मिळत नव्हते.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी आदेश दिला, तरीही महिलेस ताटकळत तास भर उभे राहावे लागले

त्या महिलेने ज्यावेळी पालकमंत्र्यांना आर्त हाक देत रेमडेसिवीरची मागणी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना आदेश दिला. त्या महिलेस ताबडतोब रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या, असे आदेश दिले. तरीही त्या महिलेस तासभर ताटकळत थांबविण्यात आले. तासाभरानंतर त्या महिलेस रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्यात आले.

हेही वाचा -सोलापुरात तयार होतोय 'रेमडेसिवीर इंजेक्शन'चा कच्चा माल

Last Updated : Apr 18, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details