सोलापूर - सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने ( Women And Her Son Suicide ) एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
एकाच साडीने घेतला आई व मुलाने गळफास -उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (62 ) रा. शिवगंगा नगर, शेळगी दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (42) रा, शिवगंगा नगर, शेळगी, असे मृत आई व मुलाचे नाव आहे. राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत होते. नेहमी घरातून ये जा करणाऱ्या घरात शांतता दिसत होती. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आत घरात डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.