माढा- सध्या खरीप हंगामातील पिकांचा मळणी हंगाम सुरू आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकांच्या काढण्या पूर्ण झाल्या असून शेतकरीवर्गामध्ये पिकाची मळणी करण्याची लगबग सुरू आहे. मात्र, या दरम्यानच माढा तालुक्यातील बुद्रुकवाडीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्रात साडीचा पदर आणि डोक्याचे केस अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विमल विलास आतकरे ( वय -४८)असं त्या मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
गावातील विष्णु दळवी यांच्या शेतात बाबासाहेब उदंगे यांचे मळणी यंत्र सोयाबीन काढणीसाठी आले होते. मजुरी काम करण्यास आलेल्या आतकरे या सोयाबीन टाकण्याचे काम करीत असताना त्यांचे केस व साडीचा पदर मळणी यंत्राच्या शाफ्ट मध्ये अडकला. मळणी यंत्रामध्ये आतकरे खेचल्या गेल्या आणि क्षणार्धात त्यांच्या डोक्याचा भूगा झाला. माढा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर येऊन पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आतकरे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला होता.
दुर्दैवी मृत्यू... मळणी यंत्रात अडकून माढ्यात मजूर महिलेचा मृत्यू
मळणी यंत्रात साडीचा पदर अडकून मजूर महिला ठार झाल्याची घटना माढा तालुक्यातील बुद्रुक वाडीत घडली आहे. सोयाबीनची मळणी सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.
मळणी यंत्रात अडकून माढ्यात मजूर महिलेचा मृत्यू
आतकरे यांच्या पश्चात पती, सासू,सासरे, दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.